spot_img
देशभारताला धक्का! विनेश फोगटच सुवर्ण स्वप्नं भंगलं; स्पर्धेतून ठरवलं अपात्र, कोण काय...

भारताला धक्का! विनेश फोगटच सुवर्ण स्वप्नं भंगलं; स्पर्धेतून ठरवलं अपात्र, कोण काय म्हणाले पहा…

spot_img

नवी दिल्ली – Vinesh Phogat:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते.

स्पर्धेच्या नियमांनुसार, कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहणे अनिवार्य आहे. मंगळवारी रात्री विनेशचे वजन अंदाजे २ किलो जास्त होते, आणि त्यानंतरही तिने रात्रीभर सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, तिचे वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले.

भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, “कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट आहे.” भारतीय चमूने तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला होता. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले होते. तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाच हिचा ७-५ ने पराभव केला होता.

विनेश फोगाट अपात्र; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले …
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंत .ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. “विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पण मला माहित आहे की आव्हानांना सामोरे जाणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही मजबूतीने कमबॅक करताल, आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय”
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. त्या त्यांनी, “एकाच दिवशी जगातील तीन धुरंधर पैलवानांना हरवल्यानंतर आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश फोगाट आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला त्यांची नियत आणि योग्यतेवर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या सर्वांना उत्तर मिळाले आहे. ज्यांनी विनेशला प्रचंड त्रास दिला त्या सत्ताधाऱ्यांची संपूर्ण यंत्रणा भारतमातेच्या या लेकीसमोर जमीनदोस्त झाली आहे. चॅम्पियन्सची हीच खासियत असते, ते मैदानातील आपल्या कामगिरीने प्रत्युत्तर देतात. विनेश तुला खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विनेशविरोधात ब्रिजभूषण सिंह यांचा सर्वात मोठा कट; सासऱ्यांचा गंभीर आरोप
कुस्तीपटू विनेश फोगट वजन अवघे काही ग्रॅम जास्त ठरल्याने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. तिचा आजचा सामना सुवर्णपदकासाठी होणार होता. मात्र आता तिचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने ती अपात्र ठरली आहे. यामुळे भारताला कुस्तीत सुवर्णपदक मिळण्याची संधी संपल्यात जमा आहे. यानंतर सोशल मीडिया आणि समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनेश विरोधात हा सर्वात मोठा कट आहे असा आरोप तिचे सासरे राजपाल राठी यांनी केला आहे.

राजपाल राठी यांनी काय म्हटलं आहे?
“विनेशच्या विरोधात ब्रिजभूषण सिंह यांनी सर्वात मोठा कट रचला आहे. डोक्यावर असलेल्या केसांमुळेही १०० ग्रॅम वजन वाढू शकतं. मात्र तिच्या विरोधात हा कट रचण्यात आला आहे. विनेशचं अपात्र ठरणं ही बातमी मनाला वेदना देणारी आहे. तिच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं. सपोर्ट स्टाफने तिला कुठलीही मदत केली नाही. डोक्यावरच्या केसांमुळेही १०० ग्रॅमपर्यंत वजन वाढतं.” असं राजपाल राठी यांनी म्हटलं आहे. त्यांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप केला आहे. राजपाल राठी पुढे म्हणाले, ” मी अद्याप विनेशशी बोललो नाही. मात्र तिच्या विरोधात कट रचला जातो आहे हे तिने मला सांगितलं. विनेश फोगटने जयपूर आणि इतर ठिकाणीही हे वक्तव्य केलं. विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने लोक संतापले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांनी विनेशच्या विरोधात सर्वात मोठा कट रचला आहे. ज्याची भीती होती ती गोष्ट घडली. मंगळवारी जी मॅच झाली त्यावेळी वजन का वाढलं नाही? ” असा प्रश्नही राजपाल राठी यांनी विचारला आहे.

डिहायड्रेशनमुळे विनेश फोगाट बेशुद्ध; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विनेश फोगटची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिचे हेल्थ अपडेट समोर आले आहेत.

डिहायड्रेशनमुळे विनेश फोगटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाही तर स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मिळाल्या माहितीनुसार, तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिची तब्येत आता स्थिर असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच तिला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं.

‘यात सरकारचाच हात..’ विनेश फोगाट अपात्र ठरताच कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी (६ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. तिने ५० किलोग्रॅम वजनी गटात जगातील नंबर १ पैलवानाला हरवत फायनल गाठली. मात्र फायनलच्या दिवशी कोट्यावधी भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. विनेशचं वजन ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅमने अधिक असल्याने ती फायनल सामन्यातून अपात्र ठरली आहे. दरम्यान विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर तिचे सासरे म्हणाले की, ‘ १०० ग्रॅम वजन वाढणं खूप नसतं. डोक्यावरील केसांमुळेही १०० ग्रॅम वजन वाढतं.’ यामागे सरकार आणि बृजभूषण सिंग यांचा हात असल्याचाही आरोप तिच्या सासऱ्यांनी केला आहे. ‘ ही खूप धक्कादायक बातमी असून राजकारण केलं जात आहे.१०० ग्रॅम वजन वाढल्याने कोण बाहेर काढतं? सपोर्ट स्टाफनेही कुठलीही मदत केलेली नाही.’ असा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला आहे.

विनेश विरोधात कट रचला जातोय
‘ माझ्या विरोधात कट रचला जात असल्याचं विनेशने अनेकदा सांगितलं. तिने जयपूरला असतानाही असं वक्तव्य केलं होतं. माझं आणि तिचं अद्यापही बोलणं झालेलं नाही.’ असं तिचे सासरे म्हणाले.

दरम्यान, ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती. आज फायनल होती. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात आव्हान दिलं होतं. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. मात्र आता या स्पर्धेतून विनेश बाहेर पडल्याने भारतीयांचे स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता. सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; कोण अडकलं जाळ्यात, वाचा सविस्तर

अव्वल कारकून चार लाखांच्या लाचेच्या जाळ्यात अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रस्त्याच्या कामाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी...

शिवसेनेला 32 आजी-माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र! भाजपा-एकनाथ शिंदे सेना यापैकी एक पर्याय निवडला जाणार

जनाधार नसलेल्यांच्या आरोपांनी वैतागले पदाधिकारी | गुप्त बैठकीत झाला निर्णय | भाजपा-एकनाथ शिंदे सेना...

राज्यात कुठे-कुठे फेरमतमोजणी? निवडणुक आयोगाकडून कुणाला मिळाला दिलासा…

नाशिक | नगर सह्याद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम...

अहिल्यानगर: बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा! कापड बाजारातील अतिक्रमण हटणार का?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या...