spot_img
अहमदनगरवर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला? राजकीय घडामोडींना वेग, बंद दाराआड चर्चा

वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला? राजकीय घडामोडींना वेग, बंद दाराआड चर्चा

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री –
राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मध्यरात्रीपर्यंत महत्वाची बैठक पार पडली. अंदाजे दीड ते दोन तास झालेल्या बंद दाराआडच्या या बैठकीत राज्यातील राजकारणासह तसेच शुक्रवारपासून सुरु होणार्‍या अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

या अधिवेशात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा विश्वास वाढलेला असणार आहे. महाविकास आघाडी आक्रमक असणार आहे. विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक असणार आहे. त्यांच्याकडून सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. त्याला महायुती म्हणून कसे सामोरे जायचे? विरोधकांना सडेतोड उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

तसेच, अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी महायुतीतील अनेक आमदारांची इच्छा होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाईल. त्यामुळे आपआपल्या पक्षातील आमदारांना धीर धरायला लावा, असेही बैठकीत सांगण्यात आल्याचे कळतेय.दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी हव्या, कोणते निर्णय घ्यावे त्यावर चर्चा होणार आहे. तसेच विरोधकांकडून खोटा नेरेटिव्ह पसरावला जात आहे. त्याला कसे उत्तर द्यावे, यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आणि मंत्रीमंडळ विस्तार यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...