अहमदनगर | नगर सह्याद्री:-
शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालणारे २ आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने उत्तरप्रदेश येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली.
हरिभाऊ गणपत अकोलकर, महेश दत्तात्रय हरवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेेत.शेवगाव पोलिस ठाण्यात शेअरमार्केटच्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. राजेंद्र रामराव आढाव यांनी तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी हे पसार होते. पोलिसांनी आरोपींचा कसून शोध होते. सदर आरोपी हे उत्तरप्रदेश येथील वृदांवन येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावत सदर आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली.