अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्यात महायुतीचे सरकार असून पावसाळी अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली असून महिलांना कागदपत्र जमा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेरून सक्कर चौक पंडित हॉस्पिटल समोरील कार्यालयामध्ये सुरू केली आहे.
या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी कागदपत्रासह उपस्थित राहून आपले फॉर्म भरून घ्यावेत. महिलांना अधिक-अधिक सोयीच्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयामध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले असून नगर शहरातील महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रा.माणिकराव विधाते व वैभव ढाकणे यांनी दिली.