अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहर कात टाकत आहे. शहराच्या इतिहासात कधीच एव्हढा मोठा विकासनिधी कधीही मिळाला नव्हता. मात्र काही संशयीतांना हे पहावले जात नसल्यानेच ते खोटे अर्थहीन आरोप करत आहेत. शहरा बाबत चांगला विचार करण्यासाठी त्यांच्या बुद्धीत वाढ होणे आवश्यक आहे. गेले ३५ वर्षांपासून त्यांची एकच कॅसेट चालू आहे. दोनवेळा त्यांना नागरिकांनी मतांनी नाकारले असतानाही त्यांचे तेच तेआरोप चालू आहेत. मात्र त्यांच्या काल्पनिक आरोपांकडे जनता मनोरंजन म्हणून पहात दुर्लक्ष करत आहे.
ही निवडणूक शहराच्या भविष्याची निवडणूक आहे. त्यामुळे नितांत आवश्यकता असलेल्या विकास कामांचाच मुद्दा घेवून मी जनतेपुढे गेलो आहे. उड्डाणपूल, नवी पाणी योजना, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, म्युझिकल फाऊन्टन, अद्यावत आरोग्य सुविधा, पथदिवे, नाट्यगृह, भुयारी गटार, उद्यानानाचा विकास, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा सर्वच क्षेत्रात कामे झाली आहेत. विकासाचा हा वेग अजून वाढवायचा आहे. त्यामुळे आजपर्यंत तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ न देता येणाऱ्या पिढीला अभिमान वाटावा असे विकसित मेट्रो सिटी नगर मला कायाचे आहे. शरीरात जोवर प्राण आहे तोवर नगर विकासाचाच ध्यास आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
शहराचा आमदार या नात्याने आ.संग्राम जगताप यांनी गेल्या १० वर्षात शहरात केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक दाखवून येणाऱ्या ५ वर्षाचे शहर विकासाचे ‘व्हिजन २९’ मांडले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांच्या उपस्थितीत शहराचा भूतकाळ व बदलते भविष्य नगरकरांसमोर सचित्र मांडले. आ.जगतापांचे विकसित नगरचे सादरीकरण उपस्थितांना भावले. या उपक्रमाचे टाळ्यांच्या गजरात सर्वांनी कौतुक केले. शहरासाठी काय केले व पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगणारे ते पहिलेच आमदार ठरले.
आ,जगताप पुढे म्हणाले, अहिल्यानगर शहर चहूबाजूंनी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहर विकासाचा गाडा ही आता वेगाने पुढे नेत पुढील २० ते २५ वर्षांचा विचार करून शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडे सादर केलेल्या ५५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास महायुती सरकारने तत्वता: मान्यता दिल्याने १५० कोटी रुपयांच्या विकासनीधीचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने शहरात विकास कामांना प्रर्माभ झाला आहे. आता पुढचे उद्दिष्ट उर्वरित ४०० कोटी रुपयांचा निधी मिळवण्याचे आहे. शहरातील प्रमुख खड्डेमय रस्त्यांचे आता कॉंक्रीटीकरण होत आहे. आता हे कॉंक्रीटीकरणाचे काम केवळ रस्त्यांपर्यंत न ठेवता जोपर्यंत विमानतळापर्यंत जाणार नाही तोपर्यंत हे कॉंक्रीटीकरण थांबणार नाहीये. नगरमध्ये विमानतळ होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीने प्रयत्न करणार आहे. अजून तीन उड्डाणपूलांच्या कामास सुरवात होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आ.संग्राम जगताप यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या शहर विकास कामांची सविस्तर सचित्र माहिती मांडली. पूर्वाधात भविष्यातील विकासाचे ‘व्हिजन २०२९’ त्यांनी मांडताना सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही याच पद्धतीने कटिबद्ध राहून नागरिकांना चांगल्या अद्यावत सोयीसुविधा देण्याचे नियोजन केले आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलवून शहराची वाटचाल मेट्रो सिटी करण्याच्या दिशेने करण्यासाठी ‘व्हिजन २०२९’ हे दमदार पाउल ठरणार आहे. यामध्ये मुबलक व नियमित पाणी पुरवठ्यासाठी फेज ३ पाणी योजना या ८५० कोटींच्या योजनेला तत्वतः मान्यता.
शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल व वातानुकूलित शाळा करणे. शहरातील गंजबाजार येथील भाजी मार्केटची अद्यावत इमारत उभारून नवनिर्मिती. आबाल वृद्धांसाठी शहराच्या विविध भागांमध्ये निसर्ग संपन्न उद्यानांचा विकास, सीना नदी परिसराचा कायापालट करत ऑक्सिजन पार्कची निर्मिती. शहर व उपनगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी प्रदूषण मुक्त ई बस सेवा सुरु करणार. शहरातील महिलांसाठी नामांकित गृहउद्योगांमार्फत रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. बुरुडगाव व मुकुंदनगर भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भवनांची उभारणी करण्यात येईल.
तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारली जाणार आहे. पिंपळगाव माळवी येथील महानगरपालिकेच्या ६५० एकर जागेत थीम पार्कची निर्मिती होणार आहे. यामुळे शहरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे .शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी डी.एस.पी. चौक, एमआयडीसी मधील सन फार्मा चौक आणि सह्याद्री चौक येथे दुपदरी उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी निधी देखील मंजूर झाला आहे. एम.आय.डी.सी.च्या विस्ताराच्या माध्यमातून नगर मधील युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार येथेच मिळणार आहे. यासोबतच सीना नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणाचा आणि कायापालटाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील संग्राम जगताप यांनी यावेळी मांडला.
यावेळी गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासासाठी केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक आ.संग्राम जगताप यांनी मांडले. ते म्हणाले, गेल्या ५ वर्षात रस्ते विकासाला गती देताना शहरातील मुख्य डीपी रस्त्यांची कामे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करत पूर्णत्वाच्या टप्यावर आणली. तसेच शहराच्या विविध ४२ भागांमधील रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटींची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाणी समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मुळा धरण ते विळद घाट ते वसंत टेकडी दरम्यान पाइपलाइन, पंपिंग स्टेशन आणि साठवण टाक्या करिता १३७ कोटींचा निधीसह पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घंटागाड्यांची उपक्रम सुरु केला. शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेसाठी नवीन भुयारी गटार योजनाही मार्गी लावली. शहरातील प्रत्येकाला सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळावी म्हणून बुरूडगाव रोडवर मनपा माध्यमातून सुरू केलेले सुपरस्पेशालिटी हाॅस्पीटलचे काम, सावेडीत सुरू केलेले अकोमोडेशन आणि रिझर्वेशन पॉलिसीमध्ये अद्ययावत हाॅस्पीटलचे काम प्रगतीपथावर आहे. चौकांचे सुशोभीकरण करताना महापुरूषांची स्मारके उभारणीस प्रारंभ केला.
क्रीडांगण विकासाचा विषय हाती घेतला आणि वाडिया पार्क विकासासाठी १५ कोटींचे काम लवकरच सुरु होणार आहे तसेच केडगाव येथे नवीन स्पोर्टस् काम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार आहे. माळीवाडा, बस स्थानक क्रमांक ३ (पुणे), ताराकपूर बसस्थानकांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून विळद परिसरात शासनाकडून ६०० एकर जागा एमआयडीसी विकासासाठी हस्तांतरीत झाली आहे. यामुळे उद्योग विकासासोबत रोजगार निर्मिती मोठी मदत होणार आहे. विजेची बचत करणार्या सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते आहे. शहर विकासाची ही कामे शहराच्या विकासाची पायाभरणीच ठरली आहेत. बऱ्याच वर्षांनंतर नगर शहराला संग्राम जगताप यांच्या रूपाने शहराला सत्ताधारी आमदार लाभले. त्यामुळे राज्य सरकार कडून शहराच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त करण्यात आ.जगतापांना मोठे यश आले आहे. त्यामुळेच शहरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.