spot_img
अहमदनगरनिमगावकरांची खासदार निलेश लंकेंना चपराक!

निमगावकरांची खासदार निलेश लंकेंना चपराक!

spot_img

संदेश कार्लेंचे फटायांच्या आतषबाजीत जंगी स्वागत
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी निमगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याच निमगाकरांनी संदेश कार्ले यांचे गावात ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून खासदार लंके यांच्या टीकेला निमगावकरांनी मोठी चपराक दिल्याचे बोलले जातेय.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीनंतर पंचरंगी दिसणारी निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात तिरंगीच होणार असल्याचे समोर आले आहे. या मतदारसंघात महायुतीकडून काशिनाथ दाते, महाविकास आघाडीकडून राणी लंके तर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदचे सदस्य संदेश कार्ले यांच्यातच प्रामुख्याने लढत होत आहे. संदेश कार्ले नगर तालुक्यातील असल्याने नगर तालुक्यातून ते मोठे मताधिक्य घेतील असा अंदाज नगर तालुक्यातून व्यक्त केला जातोय.

दरम्यान नगर तालुक्यात निमगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी निष्ठावंत शिवसैनिक संदेश कार्ले यांच्यावर सडकून टीका केली. प्रवरेचे टेंडर भरलेले कसले निष्ठावंत शिवसैनिक असा हल्लाबोल नाव न घेता केला. तसेच मी ठरवलं तर ग्रामपंचायत सदस्यही होवू देणार नसल्याचाही इशारा दिला. या लंकेेंच्या विधानामुळे पारनेर-नगर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यानंतर निमगाव येथे प्रचारार्थ संदेश कार्ले यांनी प्रचार रॅली काढली. या रॅलीमध्ये निमगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ढोल ताशांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.

दरम्यान निमगावमधून अपक्ष आणि निष्ठावंत शिवसैनिक संदेश कार्ले यांनाच लीड मिळणार असून तेच आमदार होतील असा आशावाद निमगावकरांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी | नगर सह्याद्री फोडाफोडीमुळे लोकसभेत...

पारनेरच्या राजकारणात ट्विस्ट; सुजित झावरे किंगमेकरच्या भूमिकेत!, काय घडलं पहा…

पारनेर | नगर सह्याद्री- विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार यांच्या आदेशाने उमेदवारी मागे घेतलेले...

विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

बाजार समिती निवडणुकीत केलेली चूक विजय औटी यांना भोवली | रामदास भोसले हे पारनेरची...

‘ईडी’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई, २४ ठिकाणी छापेमारी, १२५ कोटी…

मुंबई / नगर सह्याद्री - मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या...