spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणीला रक्षाबंधनला ओवाळणी! खात्यात थेट ३००० हजार जमा होणार?

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला ओवाळणी! खात्यात थेट ३००० हजार जमा होणार?

spot_img

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असून, ऑगस्टचा हप्ता देखील त्याच दिवशी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात थेट ₹३००० जमा होण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास विभागाने ३० जुलै रोजी अधिकृत शासन निर्णयाद्वारे २९८४ कोटी रुपयांचा निधी जुलै हप्त्यासाठी वर्ग केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. सरकारकडून ऑगस्ट हप्त्याचाही विचार सुरु असून, दोन्ही हप्ते एकत्र ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवशी देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

योजनेतून तब्बल २६.३४ लाख महिलांचे अर्ज निकषांमध्ये न बसल्यामुळे बाद करण्यात आले असून, उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातच रक्कम जमा होईल. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० इतकी आर्थिक मदत दिली जाते. जुलै हप्ता रखडल्याने अनेक महिलांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राखीच्या सणाला आर्थिक मदत मिळाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार…

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के:- मुंबईतील साखळी बाँब स्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर राज्य आणि...

नगर तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी ‘महेंद्र हिंगे’

उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुका...

तारकपूरला चोरट्यांचा डल्ला; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- तारकपूर परिसरात चोरट्यांनी घरात डल्ला मारुन तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला...

पारनेर तालुक्यातील ‌’या‌’ ५४ गावांचा डोंगरी विभागात समावेश!

सुपा । नगर सहयाद्री:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पारनेर तालुक्यातील 54 गावांचा...