spot_img
अहमदनगरनगरमध्ये राजकीय भूकंप; ठाकरेंना झटका!, कोण कोण करणार जय महाराष्ट्र...

नगरमध्ये राजकीय भूकंप; ठाकरेंना झटका!, कोण कोण करणार जय महाराष्ट्र…

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

विधानसभा निवडणुकीमध्ये नगर शहरात ठाकरे गटाची मोठी ताकद असतानाही येथील जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती. त्यामुळे नगर शहर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या मनातील खदखद बाहेर आली होती. तसेच बहुतांशी आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचे बोलले जात होते. नगर शहरातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी हे ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दुजोरा मिळाला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी अशी मागणी पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांनी केली होती. परंतु ऐन वेळी नगर शहराची जागा शरद पवारांच्या राष्ट्रीवादीला सोडण्यात आली. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसैनिकांमधील नाराजी चव्हाट्यावर आली. तसेच पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अहिल्यानगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे चिन्हे आता दिसू लागले आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून अनेक पदाधिकारी, आजी माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून लांब रहाणे पसंत केले. नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून ते जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या समवेत मुंबईला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. भेटी नंतर पक्षप्रवेशाची तारीख व वेळ ठरविली जाणार आहे. यास शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांकडून दुजोरा मिळाला आहे.

दिलीप सातपुते यांची पुन्हा घरवापसी!
शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नगरमधून सर्वात अगोदर दिलीप सातपुते यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. तसेच त्यांची नगर शहर प्रमुखपदी नियुक्तही करण्यात आली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पदावरुन हटवत त्यांच्या जागी नगर शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पक्ष प्रवेश झाला. परंतु, त्यांच्यावर पक्षातील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता पुन्हा दिलीप सातपुते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

शेंडगे-कदमही करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र!
नगर शहरातील आजी-माजी नगरसेवकांचा मोठा गट ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचे समोर आले आहे. त्यातील काही जण मुंबईला रवाना झाले आहेत. तर काही जण संपर्कात असून टायमिंग साधणार आहेत. माजी महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती शिवसेनेचे पदाधिकारी संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक राम नळकांडे, सचिन शिंदे हे वैष्णव देवी दर्शनाला गेले आहेत. वैष्णवदेवीचे आशिर्वाद घेऊन ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारीही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भव्य सोहळा ठरणार ः सचिन जाधव
ठाकरे गटातील अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत. काही नगरसेवकांसमवेत आम्ही मुंबईला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. मोठ्या संख्येने पदाधिकारी, नगरसेवक पक्षात प्रवेश करणार असल्याने प्रवेश मुंबईत ठेवायचा की अहिल्यानगर शहरामध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली.

नगर तालुक्यातील अनेकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
नगर शहराप्रमाणेच पारनेर विधानसभा मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती. पारनेरमध्ये शिवसैनिकांची मोठी ताकद आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, पारनेर तालुका प्रमुख श्रीकांत पठारे यांनी तयारी केली होती. उमेदवारी अर्जही दाखल केले. पठारे यांनी माघार घेतली परंतु, कार्लेे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. कार्ले यांनी १० हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राणी लंके यांचा पराभव झाला असल्याचे निकालानंतर समोर आले. ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने संदेश कार्ले यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, गोविंद मोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...