spot_img
ब्रेकिंगपारनेर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी 'या' तारखेला सोडत सभा

पारनेर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत सभा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा इंदिरा भवन, पारनेर पोलिस स्टेशन समोर, पारनेर येथे दिनांक 23 आणि 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये 05 मार्च 2025 ते 04 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक 17 एप्रिल 2025 आणि 2011 च्या जनगणनेच्या आधारे, पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्यासह महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदांचे आरक्षण ठरवले जाईल. पहिली सोडत सभा 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्यासाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित केले जाईल.

दुसरी सभा 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी सरपंच पदांचे आरक्षण ठरवण्यात येईल. या सभेच्या आयोजनाबाबत तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही सभा पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे पुढील पाच वर्षांसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...