spot_img
ब्रेकिंगशहरातील व्यापारी संकुलाला भीषण आग; आठ दुकानदारांचे व्यवसाय जळून खाक, कुठे घडली...

शहरातील व्यापारी संकुलाला भीषण आग; आठ दुकानदारांचे व्यवसाय जळून खाक, कुठे घडली घटना?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वागजोई चौकात माजी सरपंच पोपटराव आबा पाचपुते यांच्या मालकीच्या व्यापार संकुलाला मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या आगीत आठ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर आगीत हॉटेल स्वराज, नंदिनी साडी सेंटर, के. के. पेढा, वाघमारे भेळ सेंटर, महाराष्ट्र बेकरी, के. के. पानवाला, सत्कार पानवाला, आणि सानवी मिल्क अँड प्रॉडक्ट्स ही दुकाने आगीत भस्मसात झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर नगरपालिकेचे अग्निशामक दलही दाखल झाले. संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्व दुकाने जळून खाक झाली होती.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलीस कॉन्स्टेबल कुटे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पीएसआय लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल चोभे व तरटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसात दोन घटना
कालच श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोडवरील‘एस संकल्प मॉलला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. नवरात्री व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्टॉक केलेला संपूर्ण माल जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. ही आगीची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरच्या तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर; दिले महत्वाचे आदेश

पावसामुळे शेती पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पारनेर / नगर सह्याद्री - गेल्या काही...

सुपा परिसरात अतिवृष्टी: ‘तो’ रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा सविस्तर

सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव...

वरुणराजा कोपला…; शेवगाव, पाथर्डी, जामखेडमध्ये दाणादाण

शेवगाव, पाथर्डी, जामखेडमध्ये दाणादाण | पाच दिवस यलो अलर्ट सुपा | नगर सह्याद्री सलग दुसऱ्या...

प्रेमाच्या नाटकात शिक्षिका झाली फसवणुकीची शिकार; चहावाल्या प्रियकराने घातला २२ लाखांला गंडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लग्नाचे खोटे वचन देत एका ४२ वर्षीय शिक्षिकेची तब्बल २२...