spot_img
ब्रेकिंगनगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून २ लाख ५४ हजार १०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी स्वप्नील समाधान सावळे (वय २३, रा. केडगाव, अहिल्यनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ जुलै २०२५ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचे चुलते गजानन शामराव सावळे यांनी फोनवर आजी विठाबाई शामराव सावळे यांच्या निधनाची बातमी कळवली. त्यानंतर स्वप्नील, त्यांची आई कल्पना समाधान सावळे आणि भाऊ राहुल समाधान सावळे मूळ गावी जळगाव सपकाळ येथे गेले. सर्व विधी आटोपून ते गावीच थांबले होते.२ ऑगस्ट २०२५ रोजी शेजारी बबन सोनटक्के यांनी स्वप्नील यांना फोन करून घराचे दार उघडे असल्याचे सांगितले.

बबन यांनी घराची पाहणी केली असता, दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. स्वप्नील नगरमध्ये येवून पाहिले असता आईचे सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. १ तोळ्याचे गहू मणी पोत, ३ ग्रॅमचे पेंडल, २ तोळ्याचे शॉट गंठण, ३ तोळ्याचे मिनी गंठण, १ तोळ्याचे कानातील वेल, ९ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, २ ग्रॅमचे बाळे आणि ७ भार वजनाच्या चांदीच्या पायातील पट्ट्या यांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...