spot_img
ब्रेकिंगजीवाचा थरकाप उडवणारा प्रकार! सात मिनिटांमध्ये सिलिंडरचा स्फोट, नेमकं काय घडलं?

जीवाचा थरकाप उडवणारा प्रकार! सात मिनिटांमध्ये सिलिंडरचा स्फोट, नेमकं काय घडलं?

spot_img

Maharashtra News: छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्याने आगीचा भडका उडाला. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. मोठा भडका उडाल्यानंतर शेजारीच असणाऱ्या गादीघराला देखील आग लागली. पाहता पाहता आगीने लगतची आणखी तीन दुकाने गिळंकृत केली.

नेमकं काय घडलं?
देवळाई परिसरातील विजयंतनगर येथे सोमवारी सायंकाळी ही थरकाप उडवणारी घटना घडली. या भागात राहुल शेवाळे यांच्या जागेवर पत्र्याचे शेड उभारून चार दुकाने काढण्यात आली. पहिल्या दुकानात शेवाळे यांचीच दूध डेअरी आहे, तर शेजारी फळांचे दुकान, त्या शेजारी गादीघर आणि त्या शेजारी फॅब्रिकेशनचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास फॅब्रिकेशनच्या दुकानात कामगार लोखंड कापत होते. लोखंड कापताना उडालेल्या ठिणग्या शेजारच्या गादीघरात उडाल्या. त्यातून आग पसरली आणि बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. तिन्ही दुकानांतील लोक आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण आग भडकतच गेली.

सात मिनिटांमध्ये सिलिंडर फुटला
अवघ्या सात-आठ मिनिटांमध्ये फॅब्रिकेशनच्या दुकानातील सिलिंडर फुटला. यातील काही तुकडे शेजारील तीन मजली यश प्लाझा अपार्टमेंटमधील दीपक भाटी यांच्या फ्लॅटची भिंत तोडून आतमध्ये शिरले. हा स्फोट एवढा भीषण होता की या इमारतीमधील तीनही मजल्यांवरील फ्लॅटमधील सर्व काचा फुटल्या. तळमजल्यावर असलेल्या आरोही जनरल या कटलरीच्या दुकानाचेही नुकसान झाले.

उडालेला सिलेंडर फ्लॅटवर पडला
स्फोटातील सिलिंडरचे तुकडे पहिल्या मजल्यावर पडले. तर, कार्बाइड टाकण्याच्या सिलिंडरचा एक तुकडा रॉकेट लाँचरसारखा ‘यश प्लाझा’शेजारी असलेल्या ‘तिरुमला रॉयल’ या पाच माजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या सुहास संत यांच्या फ्लॅटवर पडला. त्यांच्या फ्लॅटला उत्तरेकडून दोन फुटांचे भगदाड पडले आहे. या स्फोटाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...