spot_img
अहमदनगरआ. काशिनाथ दाते विधानसभेत गरजले! पारनेरकरांसाठी केल्या 'या' मोठ्या मागण्या

आ. काशिनाथ दाते विधानसभेत गरजले! पारनेरकरांसाठी केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पाटबंधारे विभाग,सार्वजनिक विभाग, कृषी विभाग आदीं कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी भाडयाने आहे. पारनेर मध्ये एक प्रशासकीय इमारत उभारली गेली तर सर्व कामे एकाच ठिकाणी होतील. त्यामुळे पारनेर मध्ये प्रशासकीय इमारत लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी अशी मागणी आ. काशिनाथ दाते यांनी केली.

रेल्वे क्रॉसिंग पूल मंजूर करा! 
एशियाई विकास बॅंक मार्फत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा, सारोळा स्टेशन रस्त्याचे काम मार्गी लागत आहे. दरम्यान, अस्तगाव व सारोळा स्टेशन यांना जोडणारा इंग्रज कालीन कमानीचा दगडी फुल ओढ्यामध्ये आहे. येथील वाहतूक ओढ्यावरून होत असून रेल्वे सुरक्षा बांधकाम अंतर्गत या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग पूल होणे गरजेचे आहे, अशी मागणी आ. काशिनाथ दाते यांनी केली.

बार असोसिएशनसाठी इमारत मंजूर करा! 
पारनेर येथे न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम चालू आहे.परंतु वकिलाच्या दृष्टीने तिथे सुविधा उपलब्ध नाही. न्यायालय इमारतीचा भूखंड पाच एकर आहे. त्यामुळे सर्व वकिलांसाठी तेथे बार असोसिएशन यांना शासनाने जागा उपलब्ध करून इमारत उभारण्यात यावी,अशी मागणी आ. दाते सर यांनी शासनाकडे केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी द्या! 
राळेगणसिद्धी येथे सात कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. मात्र आरोग्य केंद्रामध्ये फर्निचर तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उभी करण्यात आलेली इमारत धुळखात पडली आहे. त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा , अशी मागणी आ. काशिनाथ दाते यांनी केली.

टाकळी ढोकेश्वर रुग्णालयाचे विस्तारीकरण करा! 
टाकळी ढोकेश्वर येथे शंभर खाटांचे रुग्णालय असून आणखी शंभर खाटांचे विस्तारित रुग्णालय करावे. यामुळे याच ठिकाणी शेजारीच प्राथमिक आरोग्य केंद्राची रिकामी जागा आहे. या दोन्ही जागेवर जागेवर प्रशस्त ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करावे. अशी मागणी आ. काशिनाथ दाते यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साईंच दर्शन अधुरं राहिलं; नवरा-बायकोचा अपघातात मृत्यू, कठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची...

खळबळजनक! कर्जाचा वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कर्जाच्या वादातून तिघा जणांनी एका युवकावर काठी व दगडाने हल्ला केल्याची...

बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटणार!,आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली महत्वाची माहिती..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक...

विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम!, चाहत्यांना मोठा धक्का

नवी दिल्ली | वृत्तसंस्था गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय...