spot_img
अहमदनगरजनसेवा फाउंडेशनतर्फे रविवारी नवनागापूरमध्ये भव्य कार्यक्रम, अजय अतुलसह विविध दिग्गज लावणार हजेरी...

जनसेवा फाउंडेशनतर्फे रविवारी नवनागापूरमध्ये भव्य कार्यक्रम, अजय अतुलसह विविध दिग्गज लावणार हजेरी ! कर्तृत्ववान महिलांचाही सन्मान

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या निमित्ताने महिलांच्या करमणुकीसाठी सुप्रसिद्ध गायक संगीतकार अजय अतुल म्युझिकल नाईटचेही आयोजन करण्यात आले असून नटरंग फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांचीही नृत्य अदाकारी यावेळी पाहायला मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने व शिवाली परब यांच्या कॉमेडीचा तडका ही पाहायला मिळणार आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यात कला,मनोरंजन, गायन, संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून आली. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले.

या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे रविवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...