spot_img
अहमदनगरजी एस महानगर बँकेच्या इतिहासातील दैदिप्यमान यश! उदयदादा शेळके यांचे 'ते' स्वप्न...

जी एस महानगर बँकेच्या इतिहासातील दैदिप्यमान यश! उदयदादा शेळके यांचे ‘ते’ स्वप्न साकार; संचालिका गीतांजलीताई शेळके

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
महानगर बँकेचे दिवंगत अध्यक्ष उदय दादा शेळके यांनी सुवर्ण महोत्सव कार्यकाळात जीएस महानगर बँकेचा एनपीए शुन्य टक्के करण्याचा मानस बोलुन दाखविला होता. ते स्वप्न चालू आर्थिक वर्षात साकार झाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा सहकारी बँक व महानगर बँकेच्या संचालिका गीतांजलीताई शेळके यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बँकेच्या इतिहासात हे दैदिप्यमान यश मिळाले असून कर्मचार्‍यांनी संचालिका गीतांजलीताई शेळके यांचा सन्मान करत आनंदोत्सव साजरा केला.

जी एस महानगर बँकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा ३४ कोटी रूपये झाला असुन नेट एनपीए शून्य टक्के झाला आहे. जीएस महानगर बँकेचा ५० व्या वर्षानिमित्त मी माझ्या संस्थेचा झिरो एनपीए करून दाखवणार हा निश्चय केला होता आणि आज खर्‍या अर्थाने उदय दादांचे स्वप्न साकार झालेले आहे. पण ह्या आनंदामध्ये दादा आपल्या मध्ये नाही याची फार मोठी उणीव भासत आहे अशी खंतही संचालिका गीतांजलीताई शेळके यांनी व्यक्त केली.

दिवंगत अध्यक्ष उदय शेळके नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगायचे की माझ्या संस्थेतला कर्मचारी जरी कमी शिकलेला असेल पण तो प्रामाणिक आहे. आज खर्‍या अर्थाने आपल्या सर्वांना दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण हे दादांचे स्वप्न होतं. माझ्या बँकेचे सुवर्ण महोत्सव वर्षांमध्ये पदार्पण होत असताना मी बँकेचा झिरो एनपीए करणार म्हणजे करणार हे दादांचे वाय आज खरं ठरलं.

या यशामागे साहेबांनी सर्व कर्मचार्‍यांना दिलेली शिस्त आणि प्रामाणिकपणामुळे भरघोस नफ्यामुळे बँकेच्या इतिहासात हे दैदिप्यमान यश प्राप्त झाल्याबद्दल बँकेच्या संचालिका श्रीमती गीतांजलीताई उदयदादा शेळके यांनी वरिष्ठ अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांचे तसेच को ऑप बँक कर्मचारी संघटनेचे मनपुर्वक अभिनंदन केले.

बँकेचे कार्यकारी संचालक एम. टी. कांचन तसेच सरव्यवस्थापक सर्वस्वी पुनित शेट्टी, वासुदेव गुरम, ज्ञानदेव मते, व पाटील साहेब यांच्यासह सर व्यवस्थापक संतोष गुंड, शेटे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्य कार्यालयातील सर्व विभाग व लालबाग शाखेतील सर्व कर्मचारी वर्गाला पेढे वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...