spot_img
ब्रेकिंगसराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पती पत्नीवर जीवघेणा हल्ला; शहरात कुठे घडली घटना?

सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पती पत्नीवर जीवघेणा हल्ला; शहरात कुठे घडली घटना?

spot_img

भिंगारमधील सावता नगर परिसरातील घटना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गरोदर पत्नीला उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना सराईत गुन्हेगारांच्या टोळीने पती पत्नीवर जीवेणा हल्ला केला असल्याची प्रकार रात्री भिंगार परिसरात घडला. अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातल्या भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावता नगर परिसरात ही घटना घडली. अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरात सराईत गुन्हेगार अक्षय हंबे याच्या टोळीने पुन्हा दहशत पसरवली आहे.

दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला अक्षय हंबे भिंगार शहरात फिरत असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री सावता नगर येथील भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर त्याने व त्याच्या टोळीने विकी तनवर आणि त्यांच्या गरोदर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्‌‍यात तनवर दांपत्य जखमी झाले असून, त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

विकी तनवर यांनी सांगितले की, अक्षय हंबे आणि त्याच्या साथीदारांनी हवेत गोळीबार करून परिसरात भीती निर्माण केली. जखमी गरोदर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. हद्दपारीची कारवाई झालेला अक्षय हंबे पुन्हा भिंगार परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. गरोदर महिलेवर हल्ला करणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...