spot_img
अहमदनगरAhmednagar: मित्रच बनला वैरी ! 'असा' फसला खुनाचा प्रयत्न, पाच मित्र अडकले...

Ahmednagar: मित्रच बनला वैरी ! ‘असा’ फसला खुनाचा प्रयत्न, पाच मित्र अडकले जाळ्यात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मित्रानेच मित्राचा काटा काढण्यासाठी सुपारी घेतल्याचा व गाडीने उडवून देत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर शहरात घडली. याबाबत विशाल शिवाजी घुसळे (रा. गवळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे अशी आरोपींची नावे आहेत. विशाल घुसळे यांनी फिर्यादीत म्हटले, की मी भिंगार येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो.

आमच्या गल्लीत गवळीवाडा येथे गणेश घाडगे, प्रशांत नामदे राहतात. २५ जानेवारीला रात्री पावणे दोनच्या सुमारास सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे याच्या घरातून जेवण करून निघालो. त्यावेळी माझ्यासोबत गणेश घाडगे देखील तेथून निघाला होता. भिंगार किल्ल्याजवळ येताच मला माझा कुणीतरी पाठलाग करत आहे, असे जाणवले. मी माझी गाडी जोरात पुढे आणली. ताठेमळा येथील संघर्ष चौकात आलो असता बलेनो या गाडीचा धक्का लागला. त्यात मी खाली पडलो व मला मार लागला. त्या गाडीतून प्रशांत नामदे खाली उतरायला लागला. परंतु मला पाहताच तो गाडीतून निघून गेला, असे म्हटले आहे. दरम्यान आम्ही प्रेमदान हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता, त्यात ही बलेनो गाडी पाठलागावर असल्याचे आढळले.

मला गणेश घाडगे यावर संशय आला; कारण प्रशांत नामदे त्याचा मित्र आहे. आम्ही सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे यांच्या घरचे फुटेज तपासले. त्यात गणेश घाडगे जेवण करताना मध्येच बाहेर आला व फोनवर बोलत होता की, सगळे कांड झाले ना तुम्ही मला फोन करा. माझ्या डोयात असा विचार होता की, कांड करून तुम्ही डायरेट फरार व्हा. पुण्याला जा, पैसे लागले तर ऑनलाईन मागून घ्या, असे बोलताना आढळला. आणखी काही गोष्टी तपासल्या असता आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे आदींनी मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सर्व डाव रचला होता, असे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...