spot_img
अहमदनगरबाह्यवळण रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ठार, एक जखमी

बाह्यवळण रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ठार, एक जखमी

spot_img

सुनील चोभे । नगर सह्याद्री

बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास  ट्रक-कटेंनर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागीर ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयतांमध्ये सुब्रमण्यम गोबल (वय ४८, रा. तामिळनाडू), प्रधान सुरजकरण जाट (वय ३६, रा. अजमेर, राजस्थान) या दोन वाहन चालकांचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात ट्रक-कंटेनरचा भीषण अपघात झाला. तसेच स्वीफ्ट कार अपघातग्रस्त वाहनांना पाठीमागून धडकली. यात स्वीफ्टचे मोठे नुकसान झाले. अपघातात जखमी झालेल्या एकास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन रस्ता मोकळा करण्यात आला.

याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. आश्वासन देऊनही कंपनी व अधिकार्‍यांनी अंमलबजावणी केली नसल्याने दोघांचा बळी गेला आहे. दोघांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांना जाब विचारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...