पारनेर / नगर सह्याद्री –
Parner crime : तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात चोरीची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून चोरी करणारे दोघे जण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
याबाबत माहीती अशी की, गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे दिड वाजता तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. मंदीरात असणारी दानपेटी चे कुलुप स्कूड्रायव्हरच्या सह्हायाने तोडुन त्यातील रक्कम बाहेर काढली ही रक्कम मंदिरातील असणा-या रुमालात बांधली यानंतर देवाच्या मुर्तीजवळ असणा-या वस्तुंकडे चोरट्यांचे लक्ष गेले मुख्य मुर्तीजवळ आसलेल्या खंडोबाची पितळी धातुची असणारी मुर्ती व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरुन पोबारा केला आहे.
पहाटे पाच वाजता ही घटना समजल्यानंतर सरपंच बंटी गुंजाळ, नामदेव गुंजाळ, सुनिल गुंजाळ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात मंदिरातील चोरी बाबत माहीती दिली पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ही संपूर्ण चोरीची घटना मंदीरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
वासुंदेच्या भाऊसाहेब महाराज मंदिरातील दानपेटी फोडली
तालुक्यातील वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली स्टीलची दानपेटी चोरट्यानी फोडली असून शनिवारी सकाळी ग्रामस्थ दर्शन साठी गेले असता ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके व दिलीप उदावंत रावसाहेब बर्वे गेले असता ही बाब उघडकीस आली आहे. यासंबंधीची माहिती टाकळी ढोकेश्वर येथील पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून सहाय्यक फौजदार मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यामुळे मंदिरातील दान पेट्या व अलंकार हे चोरट्यांनी लक्ष केले असून स्थानिक ग्रामस्थांनी याची काळजी घ्यावी असे आव्हान पारनेर पोलिसांनी केले आहे.