spot_img
ब्रेकिंगअहमदनगरच्या 'या' गावात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री अनेक ठिकाणी मारला हात, वाचा...

अहमदनगरच्या ‘या’ गावात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री अनेक ठिकाणी मारला हात, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. त्यातच श्रीरामपूर तालुक्यातील
बेलापुर येथील श्रीसाईबाबा मंदिर, हनुमान मंदिरतील दानपेटी व चांदीच्या पादुकांची तसेच बेलापूर गावात बसस्टँड समोर नंबरला उभ्या असलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथील दोन रिक्षा अशा एकूण अकरा रिक्षामधील बॅटऱ्या तसेच एका रसवंती-गृहामधील ईन्व्हर्टर व तेथील बॅटरीही चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी घडला.

बेलापूर येथील श्रीसाईबाबा मंदिराला लावलेले कुलूप तोडून मंदिरात असलेल्या साईबाबांच्या चांदीच्या पादुका तसेच दानपेटी चोरली. मंदिराच्या काही अंतरावरच ती दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व चांदीच्या पादुका घेऊन चोरटे पसार झाले. तसेच गावातील एसटी बसस्टँडसमोरील नंबरसाठी लावण्यात आलेल्या नऊ रिक्षा -तसेच रामगड येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षा अशा अकरा रिक्षाच्या बॅटऱ्याही चोरून नेल्या. तसेच बेलापूर रोडवर नव्यानेच झालेले कोहिनूर रसवंती गृह येथील ईन्व्हर्टर व बॅटरी घेऊन चोरटे पसार झाले.

दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्याने तालुक्यात पोलिसांना चोरांनी मोठे आव्हान उभे केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आदी वरिष्ठ अधिकाऱ्यानी पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास श्रीरामपूर पोलिस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला’; भिडणार ‘इतके’ खेळाडू

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025...

बाप रे! १० लाखांचे घेतले ‘एवढे’; सावकारकीचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री उद्योजक महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे...

बालिकाश्रम रोडवरील अनधिकृत मजार हटवा; आ. संग्राम जगताप

अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे...

बीड जिल्हा पुन्हा हादरला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर

बीड / नगर सह्याद्री : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...