जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता
सुनील चोभे / नगर सह्याद्री –
अकोळनेर येथे जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याचे सात दिवसअखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याची सांगता हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
अकोळनेर (ता. आहिल्यानगर ) येथे सात दिवस अखंडहरी नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह सोहळ्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. दररोज होणाऱ्या पारायण गाथा सोहळा किर्तनासाठी भाविक मोठया संख्येने येत होते. नामवंत किर्तनकार महाराजांचे किर्तन झाले. या सप्ताह सोहळ्यासाठी महाप्रसादासाठी गावागावातून भाकरी येत होत्या. अकोळनेर येथील ग्रामस्थ तसेच परीसरातील नागरिकांनी भाविकांची सोय केली होती. सात दिवस भाविक येथे मुक्कामी येत राहत होते. शेवटचे काल्याचे किर्तन हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे झाले. या किर्तनासाठी जवळपास दिड लाख भाविकांनी हजेरी लावली. या येणाऱ्या भाविकांसाठी पुरणपोळीचा स्वयपांक करण्यात आला. गावागावामधुन महिलांनी पुरणपोळ्या महाप्रसादासाठी आणल्या होत्या. जवळपास चार ने पाच लाख पुरणपोळ्या जमा झाल्या होत्या.
या सोहळ्याचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके व अकोळनेर येथील ग्रामस्थांनी केले होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डीले, आ. काशीनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, आ. संग्राम जगताप, मार्केट कमिटी माजी सभापती भानुदास कोतकर उपस्थित होते.
यावेळी विखे म्हणाले या सोहळ्याने नगर तालुक्याचे भाग्य उजाळले. अहिल्यानगर मधील अकोळनेर गावात एवढया मोठया प्रमाणात सोहळा झाल्यामुळे येथील भूमी पवित्र झाली आहे. धार्मीकतेकडे येणाऱ्या ची संख्या दिवसोदिवस वाढत चालली असल्याचे विखे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. या काल्याच्या किर्तनाप्रसगी मार्केट कमिटीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी हेलीकैफ्टर मधून पुष्पवृष्टी केली.
श्री संत तुकाराम महाराजाच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. तसेच सात दिवस कृषि प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात शेतकऱ्यासाठी उपयुक्त अश्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. प्रदर्शनात ही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली. असा हा भव्यदिव्य सोहळयाचे आयोजन केल्यामुळे भाविकांनी सरपंच प्रतिक शेळके व अकोळनेर ग्रामस्थाचे आभार मानले. हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आ.शिवाजी कर्डीले, आ. काशीनाथ दाते, आ. संग्राम जगताप, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या भव्य सोहळ्यासाठी नगर तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांनी, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.