spot_img
अहमदनगरशेतीचा वाद टोकाला गेला, भावानेच भावाचा खून केला; आरोपी भावास जन्मठेप

शेतीचा वाद टोकाला गेला, भावानेच भावाचा खून केला; आरोपी भावास जन्मठेप

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेत जमिनीच्या वादातून भावाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांनी दिनकर अण्णाजी गव्हाणे (वय 65, रा. अल्हणवाडी) याला भादंवि कलम 302 अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व 5000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दिनकर अण्णाजी गव्हाणे (वय 65 रा. अल्हणवाडी, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.

2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता शहाबाई व पती मधुकर हे शेतात जात असताना दिनकर व त्याचा पुतण्या संतोष माणिक गव्हाणे हे रावसाहेब गव्हाणे यांच्या घराजवळ हातात खोरे व दगड घेवून आले. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी मधुकर यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर 2022 रोजी मधुकर यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर आरोपींविरूध्द वाढीव कलम 302 लावण्यात आले. आरोपीला अटक करून सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक पी. बी. पाटील यांनी करून आरोपींविरूध्द दोषारोपपत्र येथील जिल्हा न्यायालयात पाठविले. सदर खटल्यात सरकारच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी शहाबाई मधुकर गव्हाणे व रावसाहेब गव्हाणे यांची महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली.

परंतु दोन्हीही साक्षीदार फितूर झाल्याने आरोपी नं.2 संतोष गव्हाणे याच्याविरूध्द पुरेसा पुरावा नसल्याने त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. सदरच्या खटल्यामध्ये डॉ.मनीषा हांडे, डॉ.स्नेहल दुग्गड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार महेश जोशी व अरविंद भिंगारदिवे यांनी सरकारी वकील यांना खटल्याच्या कामकाजाच्यावेळी सहाय्य केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...