spot_img
ब्रेकिंगगुलिगत धोका! सूरज चव्हाणचा साखरपुडा एक स्वप्न, एक भन्नाट ट्विस्ट!

गुलिगत धोका! सूरज चव्हाणचा साखरपुडा एक स्वप्न, एक भन्नाट ट्विस्ट!

spot_img

Suraj Chavan Engagement: ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचा साखरपुड्याचा व्हायरल व्हिडीओ! इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सूरज एका मुलीला पाहायला जातो, प्रेमात पडतो आणि थेट साखरपुडा होतो… पण या सगळ्यामागे दडलेलं होतं एक भन्नाट ट्विस्ट!

व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज सुटाबुटात तयार होऊन, आपल्या बहिणीसोबत मुलीच्या घरी पोहोचतो. मुलगी त्याला पाणी देते, नजरानजर होते आणि क्षणार्धात दोघं प्रेमात पडतात. त्यानंतर दोघांचा साखरपुडा होतो – अंगठी देणं-घेणं, आनंदी चेहेरे… हे सर्व पाहून चाहतेही भारावून गेले. पण, व्हिडीओच्या शेवटी खुलासा होतो की हे सगळं फक्त एक स्वप्न होतं!

व्हिडीओच्या शेवटी सूरज झोपेतून उठतो आणि सर्वांचा भ्रमनिरास होतो. चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “आम्हाला तर खरंच वाटलं होतं!”, “गुलिगत धोका दिलास सूरज!” अशा प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’ नंतर ‘झापुक झुपूक’ सिनेमातून प्रमुख अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा बिग बॉसच्या मंचावरच केली होती. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता अन् अपघात विमा!

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा...

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...