spot_img
ब्रेकिंग'तो' हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस'; कालीचरण महाराजांची कुणावर जहरी टीका?

‘तो’ हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस’; कालीचरण महाराजांची कुणावर जहरी टीका?

spot_img

Maharashtra News: मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज यांनी केली आहे. रविवार दि. १७ रोजी शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी कालीचरण महाराज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केले.

कालीचरण महाराज म्हणाले, नुकतेच एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे.

आपण मतदानासाठी जात नाही. त्यामुळे मुस्लिमधर्जिणे लोक राजा बनू लागले आहेत. मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात.

जागो जागी पाकिस्तान बनला आहे, जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जादूटोणा करून रोज 40 हजार मुली पळवतात. 100 टक्के अहिंसा संभव नाही. हिंसा करावीच लागते, त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असेही कालीचरण महाराजांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...