पारनेर । नगर सहयाद्री:-
खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, अहिल्यानगर आणि संकल्प प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने हे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता वाढेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत खडकवाडी गावातील पाझर तलावातील गाळ काढणे आणि खोलीकरणाच्या कामांचा शुक्रवार दि.९ मे रोजी आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विकास रोकडे, अरुण गागरे, संजय कर्नावट, कोंडीभाऊ गागरे, संजय शिंगोटे, यशवंत हुलावळे, शिवाजी रोकडे, ज्ञानदेव गागरे, दिनकर ढोकळे, अनिल गागरे, दगडू केदार, संजय खणकर, बबन गागरे, प्रदीप ढोकळे, सखाराम नवले, बाबासाहेब गागरे, नवनाथ गागरे, नवनाथ खणकर, रामदास नवले, आंबादास नवले, शिवाजी गागरे, दादाभाऊ हुलावळे, बी डी ढोकळे, अमोल रोकडे, धनंजय ढोकळे, संतोष रोकडे, प्रसाद कर्णावट, दिनकर ढोकळे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शेतकऱ्यांची तलावातील गाळ काढण्याची मागणी होती. आमदार दाते यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष देऊन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावला. या प्रकल्पामुळे तलावातील गाळ काढल्यानंतर पाणीसाठवण क्षमता वाढणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी आमदार दाते यांचे आभार मानले असून, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल!
गेल्या अनेक वर्षांपासून तलावातील गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत हे काम हाती घेतले, याबद्दल त्यांचे आभार.
– विकास रोकडे (प्रगतिशील शेतकरी, खडकवाडी)