spot_img
ब्रेकिंगअंधश्रद्धेचा अघोरी खेळ..! भोंदू बाबाने पाजली लघवी, नाकाला बूट लावत मानेवर पाय

अंधश्रद्धेचा अघोरी खेळ..! भोंदू बाबाने पाजली लघवी, नाकाला बूट लावत मानेवर पाय

spot_img

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार या भोंदू बाबाने गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्ये केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, वैजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. संजय पगार हा भोंदू बाबा लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे अशा खोट्या थापा मारून अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. बिरोबा मंदिर परिसरात तो मंत्रांचा जप, ढोलकी वाजवणे आणि अलख निरंजन अशा आरोळ्या देत अघोरी कृत्ये करायचा. त्याच्या या कृत्यांमध्ये अनेक अमानुष प्रकारांचा समावेश होता.

बाधित व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याच्या मानेवर पाय ठेवणे आणि पोटावर काठी ठेवून धमकावणे. तसेच व्यक्तीच्या तोंडात लघवी पाजणे आणि नाकाला बूट लावणे. भूतबाधेच्या नावाखाली लोकांना भीती दाखवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. या सर्व कृत्यांचा व्हिडिओ पुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला, ज्यामध्ये बाधित व्यक्ती निमूटपणे हे अत्याचार सहन करत असल्याचे दिसून आले आहे.

हा धक्कादायक प्रकार 17 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तक्रारदार किशोर शांताराम आघाडे (वय 40, व्यवसाय-नोकरी) यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदवली. व्हिडिओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संजय पगार याच्याविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

भोंदू बाबाचा काळा चेहरा उघड
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत संजय पगार या भोंदू बाबाचा काळा चेहरा उघड केला. त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकांनी अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा, असे समितीचे कार्यकर्ते आवाहन करत आहेत. त्यांनी शिऊर गावातील नागरिकांना अशा अंधश्रद्धाळू व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...