नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
देशात सध्या सर्वत्र थंडी आहे. मात्र, राजधानी दिल्लीतील परिस्थित वेगळी आहे. येथे गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीसोबच दाट धुक्क्यांनी पकड घेतली असून याचा थेट परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. दिल्लीतील वायु प्रदुषणात वाढ झाल्याने याचा परिणाम झाल्याने या गोष्टींशी सामना करण्याची वेळ दिल्लीकरांवर आली आहे. दाट धुक्क्यामुळे दुष्यमानता कमी झाली आहे. यामुळे हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक आदी गोष्टींवर याचा परिमाम झाला आहे. यासंबंधीचे व्हिडिओ एनआयने शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये दिल्लीतील थंडीच्या परिस्थिती अधोरिखित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कडाक्याच्या थंडी आणि दाट धुक्क्यांमुळे दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घसरण झाली आहे. IMD ने अंदाज वर्तवला आहे की, दिल्लीत 8 जानेवारीपर्यंत धुके राहतील. 6 जानेवारीला हलका स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब झालेली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) 240 पेक्षा जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला आहे.
९० उड्डाणे उशिरा
दिल्ली विमानतळाने प्रवाशांना दाट धुक्यामुळे कामकाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल सावधगिरीचा सल्ला दिला आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे म्हटले आहे. श्रीनगर, चंदीगड, आग्रा, लखनौ, अमृतसर, हिंडन आणि ग्वाल्हेर येथील विमानतळांवर शून्य दृश्यमानता आहे. एकट्या दिल्ली विमानतळावर आज सकाळी 90 हून अधिक उड्डाणे उशीर झाली आहेत.
५० हून अधिक रेल्वे गाड्या उशिराने
रेल्वे सेवेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. दिल्लीला जाणाऱ्या ५० हून अधिक गाड्या उशिराने धावत आहेत. नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस चार तासांपेक्षा जास्त उशीराने, वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस 14 तास उशिराने धावत आहे. आनंद विहार टर्मिनल सुपरफास्ट एक्सप्रेस वेळेपेक्षा सात तास उशिराने धावत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
एअरलाइन्स इश्यू ॲडव्हायझरी
एअरलाइन्सने त्यांच्या वेळापत्रकावर हवामानाच्या प्रभावाबाबत अपडेट जारी केले आहेत. इंडिगोने दृश्यमानता कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. एअर इंडियाने विलंबाचे कारण म्हणून खराब दृश्यमानता असल्याचे सांगितले आहे. यामुळे प्रवाशांना फ्लाइट स्थिती तपासण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे स्पाईसजेटने दिल्लीतील हवामानामुळे सर्व आगमन आणि निर्गमनांना संभाव्य विलंबाचा इशारा दिला आहे.