spot_img
अहमदनगरसभापती राम शिंदे अन् आमदार रोहित पवारांचा संघर्ष पेटणार; कार्यकर्त्यावर होणार...

सभापती राम शिंदे अन् आमदार रोहित पवारांचा संघर्ष पेटणार; कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधान परिषद सदस्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी, अशी औपचारिक मागणी भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते आणि गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरेकर यांनी सांगितले की, 23 नोव्हेंबर रोजी जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोरे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सदस्यांविषयी अतिशय अवमानकारक आणि दिशाभूल करणारी भाषा वापरली. या वक्तव्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. मोरे यांनी वरिष्ठ सभागृहाचा आणि प्रत्येक सदस्याचा अपमान केला आहे. ही कृती स्पष्टपणे विशेषाधिकारभंग ठरते, असे दरेकर म्हणाले.

दरेकर यांनी स्पष्ट केले की, संविधान कलम 194 नुसार राज्य विधानमंडळ आणि सदस्यांना विशिष्ट विशेषाधिकार आहेत. सभागृहाच्या मानहानीस कारणीभूत ठरणारी कोणतीही कृती कामकाजावर परिणाम करत असल्यास ती विशेषाधिकारभंगात मोडते. त्यामुळे मोरे यांच्यावर कारवाई अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. मोरे यांचे वक्तव्य सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हसत होते, असेही दरेकरांनी निदर्शनास आणले. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे हे सर्व विधान परिषदेचे सदस्य किंवा माजी सदस्य राहिले असल्याचे सांगत, मोरे यांनी केलेली टिप्पणी या सर्वांनाही लागू होते का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.

मविआ नेत्यांवर टीका करताना दरेकर म्हणाले, त्यांचा लोकांवरचा विश्वास उडाला आहे. मैदानात उतरून लढण्याची ना उमेद उरली आहे ना हिम्मत. महायुतीचा पारदर्शक कारभार पाहून त्यांना टीकाही करता येत नाही. भाजपावर लोकांचा विश्वास असल्यामुळे 100 ठिकाणी बिनविरोध निवड झाली आणि त्यांची पायाखालची जमीन सरकली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जामखेड ते विधान परिषदेसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...