spot_img
ब्रेकिंगमहायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला...

महायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला अन्…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. स्थानिक निवडणुकींच्या आधी सुरु असलेल्या पक्षांतरावरुन सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगल्यानंतर आता महाराष्ट्रात एका ठिकाणी सत्तेत असलेले शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात आमने-सामने आली आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या सेनेनं स्थानिक नगरपालिका निवडणुकीसाठी दिलेला उमेदवारच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पळवला आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. नक्की हे प्रकरण घडलंय कुठे आणि झालंय काय पाहूयात…

नेमकं घडलं काय?
पुण्यातील भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन सोनवले यांनी अचानक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोनवले यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सोनवलेंनी पक्ष बदलल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

लढत थेट भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी
आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर सोनवले शिवसेनेकडून दाखल केलेला अर्ज मागे घेणार असून राष्ट्रवादीसाठी सक्रिय भूमिका बजावणार आहेत. भोरमध्ये भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रवेशानंतर भाजपचे वजन वाढले आहे, तर राष्ट्रवादीनेही आपले स्थान सातत्याने टिकवून ठेवले आहे. या घडामोडीनंतर शिवसेनेची समीकरणे ढवळून निघत असून लढत आता जवळजवळ भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट असणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेली उमेदवार खेचाखेच, फोडाफोड आणि अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत आहेत या संघर्षाचा पुढील राजकीय परिणाम काय होईल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपा विरुद्ध शिंदेंची शिवसेना
भाजपाने ठाणे-डोंबिवली भागात शिंदे सेनेच्या प्रभावी स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले. विशेषतः डोंबिवलीतील माजी नगरसेवक राजू शिंदे यांचा भाजपात प्रवेश झाल्याने शिंदे गट संतापला. शिंदे गटाला वाटते की, भाजपा त्यांच्या बालेकिल्ल्यात (ठाणे-कल्याण-डोंबिवली) जाणीवपूर्वक शिंदे सेनेचे कार्यकर्ते-नेते फोडत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गटातील अनेक मंत्री (उदय सामंत, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आदी) हजर राहिले नाहीत. हा थेट बहिष्कार मानला जात आहे. काही मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि नाराजी बोलून दाखवली.

शिंदे, फडणवीस काय म्हणाले?
या नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, “हा बहिष्कार नाही, मंत्री माझ्यासोबत होते किंवा प्रचारात व्यस्त होते,” असं सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा केली आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते-कार्यकर्ते फोडणार नाही असा तोंडी करार केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “आधी शिवसेनेने आमचे अनेक नेते घेतले होते, आता आम्ही घेतोय तर तक्रार कशाला?” असा सवाल केला. मात्रा त्यानंतर फडणवीसांनी प्रकरण मिटवले आणि ‘कुबड्या (बाहेरचा आधार) नको’ असा संदेश दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय ; माजी आमदारपुत्राचं अजित पवारांना खुले आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं

सोलापूर / नगर सह्याद्री - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक...

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...