पुणे । नगर सहयाद्री-
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर अली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना एक प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्याच्या विरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचे रासने यांचा पराभव करत आमदार रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजय झाले होते. नेहमी चर्चत असणारे आमदार धंगेकर पुन्हा चर्चत आले आहे.
शुक्रवारी पुण्यातील गोखले नगर भागातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यावरून काँग्रेस नगरसेवकांना उद्घाटनाला न बोलावता फक्त भाजपच्या नगरसेवकांना बोलावल्याने धंगेकर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी जाब विचारत काँग्रेस पक्षाला का डावलले? आत का घेतले नाही? म्हणत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवीगाळीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.