spot_img
अहमदनगरघराच्या मालकीच्या वादातून व्यावसायिकाला गंभीर मारहाण, कुठे घडला प्रकार..

घराच्या मालकीच्या वादातून व्यावसायिकाला गंभीर मारहाण, कुठे घडला प्रकार..

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
घराच्या मालकीच्या वादातून चौघांनी व्यावसायिकाला लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. लोकेश संजय जंजाळे (वय 29 रा. कबाडगल्ली, माळीवाड) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा श्रवण जंजाळे, कविता विलास बनकर, अंकीत विलास बनकर, विलास गंगाधर बनकर (सर्व रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक आहेत. फिर्यादीने कविता बनकर हिच्या नावावर असलेले आंधळे चौरे कॉलनी येथील घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराच्या मालकीवरून फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात वाद आहेत. सोमवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी असताना संशयित आरोपी तेथे आले.

त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून घराला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पत्रे व कुलूपााची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके व लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ कृष्णा जंजाळे यांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या...