spot_img
महाराष्ट्रतेजस्वी तारा हरपला, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

तेजस्वी तारा हरपला, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

spot_img

पुणे। नगर सह्याद्री
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणाऱ्या नारळीकरांनी ‘व्हायरस’, ‘यक्षांची देणगी’ यांसारखी पुस्तके लिहिली जी खूप गाजली होती.

नारळीकर यांच्या जाण्याने वैज्ञानिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला. केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवणारे नारळीकर यांनी विश्वरचनाशास्त्र आणि सापेक्षतावादावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडला. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) आणि आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र केंद्रात (IUCAA) त्यांनी मोलाचे योगदान दिले.

विज्ञानप्रसारासाठी त्यांनी मराठीतूनही अनेक पुस्तके लिहिली. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याने भारतीय खगोलशास्त्राला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण आणि विश्वाच्या उत्पत्तीवर संशोधन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...