LPG Gas Cylinder: महिन्यांच्या सुरवातीलाच सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज पासुन वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी केली आहे.
गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला आहे. त्यानुसार, १ मार्चच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी महागले आहेत. व्यावसायिक गॅसचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कारण, बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.
घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर
घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच १६ किलोच्या सिलेंडरबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये शेवटचा बदल ३० ऑगस्ट रोजी झाला होता. म्हणजेच १४ किलोच्या सिलेंडरची किंमत ६ महिन्यांपासून स्थिर आहे. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर९०३ रुपयांना उपलब्ध आहे.