spot_img
देशअयोध्या सोहळ्याच्या मुहूर्तावर काँग्रेसला झटका!! 'माजी' खासदार भाजपमध्ये जाणार?

अयोध्या सोहळ्याच्या मुहूर्तावर काँग्रेसला झटका!! ‘माजी’ खासदार भाजपमध्ये जाणार?

spot_img

जळगाव। नगर सहयाद्री
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. यानंतर आता काँग्रेसला आणखी एक झटका बसणार असून, माजी खासदार डॉ. उल्हास पवार आपल्या कन्येसह भाजपच्या वाटेवर आहेत.

जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत. याबाबत स्वतः माजी खासदार डॉ. पाटील यांनी माहिती दिली आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश होणार आहे.

यामुळे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. या विकासयुगाच्या वाटचालीत आपण सहभागी व्हावे म्हणून कन्या डॉ. केतकी पाटीलसह भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघातून केतकी पाटील या निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...