spot_img
अहमदनगर'आरक्षणाचा विषय मार्गी लावा,अन्यथा...'; नगरच्या सकल मराठा समाजाचा सरकारला 'मोठा' इशारा, वाचा...

‘आरक्षणाचा विषय मार्गी लावा,अन्यथा…’; नगरच्या सकल मराठा समाजाचा सरकारला ‘मोठा’ इशारा, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मराठा समाजाबाबत प्रा.लक्ष्मण हाके यांनी दिलेले आव्हान नगर मराठा महासंघ स्वीकारत असून आम्ही कधी पण त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे, त्यांनी जागा निश्चित करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने नगर येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे. तर दुसरीकडे लोकसभेला काय झाले. हे सर्वांनाच माहित आहे. राज्य सरकारने आरक्षणाचा विषय जर मार्गी लावला नाही. तर विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.

नगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी अ‍ॅड. गजेंद्र दांगट, मदन आढाव, गोरख दळवी, राम जरांगे, निलेश सुंबे, गिरीश भाकरे आदी उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या बाबत लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना चर्चेचे आव्हान दिले होते. या आव्हानाला नगर मराठा संघटनेच्या वतीने हाके यांना अवाहन दिले. त्यांनी जागा व तारीख सांगावी.

आमची चर्चेला तयारी आहे. वास्तविक पाहता हाके हे सरकारच्या हातातील बाहुले आहे. सोलापूर मध्ये ते राहतात. त्यांना बीडमध्ये आंदोलन करण्याची गरज का ? पडली तर त्याचा एक कारण म्हणजे त्यांच्या नेत्यांना खुश करायचे होते. त्यांना आमदारकी पदरात पाडायची होती. म्हणून अशा प्रकारचे आंदोलन त्यांनी या ठिकाणी करायला सांगितले. हाके यांना लोकसभेला अवघे ४०० ते ५०० मते मिळतात मग ते ओबीसींचे नेते कसे झाले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

वास्तविक पाहता सत्ताधारी भाजपाने महादेव जानकर यांची मागणी ही आमदार, खासदार कायम असते. त्यामुळे त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांनी आता हाके यांचा वापर केला. त्यांना जरांगे यांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसण्यास सांगितले. वास्तविक पाहता जो माणूस उपोषण करतो. तो एवढ्या चांगल्या पद्धतीने कसा बोलू शकतो, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हाके यांना मराठा आरक्षणाबाबत काहीच माहित नाही. फक्त जसे दिले तसे ते बोलतात. त्यांना यातील काहीच माहित नाही.जर त्यांची तशी तयारी असेल तर आम्ही सुद्धा आव्हान स्वीकाराला तयार आहोत असेही मराठा समाजाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान येत्या कालावधीत राज्य सरकारने सगळे सोयरे या संदर्भातला कायदा केला नाही. तर आम्हाला लोकसभेप्रमाणेच आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. जर मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवण्याचा आदेश दिले तर आम्ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात मध्ये उतरायला तयार आहोत, असेही दांगट व दळवी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...