नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात पडद्याआड मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड राज्याची निवडणूक महिनाभरापूर्वी पार पडली. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे, तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पुन्हा आले आहे. अशातच आता बिहार राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र, पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमार हे एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाला उधाण आले आहे.
२०२९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असलेला भाजपन पक्ष विरोधी बाकवर बसला. पुढे आघाडीची सत्ता आली आणि त्यानंतर पुन्हा युतीने सत्ता मिळविली. त्यावेळी भाजपने मास्टस्ट्रोक खेळत मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदेच्या गळ्यात घातली. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली. ही संपूर्ण घटना पाहता बिहार विधानसभा निवडणुकीत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितेशकुमारचं मुख्यमंत्री असतील…
त्यामुळे नितीशकुमार संयुक्त (जनता दल, जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएतून बाहेर पडून इंडिया आघाडीत जातील, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मात्र, बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील आणि ते रालोआचे नेतृत्व करतील, असे सांगत आहेत.
बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’
बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या बैठकीत घेतला जाईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजपने जास्त जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. हेच धोरण बिहारमध्येही लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
बैठकीला अनुपस्थिती, चर्चेला उधाण
दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नितेशकुमार दिल्लीला गेले होते. मात्र, त्यांनी भाजपच्या नेत्यांना भेटणे योग्य मानले नसल्याची चर्चा आहे. त्यानंतर माध्यमांना कोणतही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. यामुळे ते भाजपवर नाराज तर नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच आठवडाभरापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थित राहणे टाळल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
नितीशकुमारांसाठी दरवाजा बंद
या चर्चा एकीकडे बिहारच्या राजकारणात झडत असताना दुसरीकडे विरोधी बाकावरील राजद पक्षाचे तेजस्वी यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, राजदचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले आहे.