spot_img
ब्रेकिंगहवामान विभागाची मोठी अपडेट! 'या' जिल्ह्यामध्ये विजांसह कोसळणार पाऊस

हवामान विभागाची मोठी अपडेट! ‘या’ जिल्ह्यामध्ये विजांसह कोसळणार पाऊस

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या साठ्यात अपेक्षित वाढ झाली आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार तडाखा दिला आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतली आहे, परंतु ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने आज, २२ ऑगस्ट रोजी राज्यभर विजांसह पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा सुरू असून आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर बांगलादेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे, ज्यामुळे ही प्रणाली पश्‍चिम बंगालकडे सरकण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि अहमदनगर येथे आज हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, रायगड आणि अहमदनगरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया भागातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...