spot_img
देशमहाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

spot_img

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार
मुंबई | नगर सह्याद्री:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा विक्रमी करार झाला आहे. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. काल्सबर्ग, लुलू समूह आदी अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रमुख व्यक्तींशी भेटी घेतल्या आणि महाराष्ट्रातील गुंतवणूकीच्या संधींची चर्चा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) पहिल्याच दौऱ्यात महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सहा लाख 25 हजार 457 कोटींवर गुंतवणूक करार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वांच्या व्यक्तींशी भेट घेत त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. काल्सबर्ग समूहाचे सीइओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली.

काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीइओ सुमंत सिन्हा यांच्याशी भेट घेऊन बीड जिल्ह्यात 15 हजार मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा केली.शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीइओ दीपक शर्मा यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.

जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले. मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाइंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीइओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. कॉग्निझंटचे सीइओ रविकुमार एस. यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

मंत्री विखे पाटील यांचा उद्या ’डॉक्टर ऑफ सायन्स’ पुरस्काराने होणार सन्मान

राहता। नगर सहयाद्री:- केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव...