spot_img
ब्रेकिंगआतली बातमी! लोकसभा फक्त ट्रेलर, पिक्चर तर विधानसभेला? पवारांची साथ मिळाल्यावर 'बड्या'...

आतली बातमी! लोकसभा फक्त ट्रेलर, पिक्चर तर विधानसभेला? पवारांची साथ मिळाल्यावर ‘बड्या’ नेत्याचा ‘मोठा’ दावा

spot_img

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताच लोकसभा निवडणुकीचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र इतर राज्याच्या तुलनेत राजकीय घडामोडी अधिक वेग घेत आहेत. दरम्यान शरद पवारांची साथ मिळाल्यावर महायुतीला राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात फटका बसणार असल्याचा दावा रासपने केला आहे.

भाजपकडून लोकसभा निवडणुकीत डावलले गेल्याने दुखावलेल्या महादेव जानकर यांना माढा लोकसभेतून शरद पवार यांनी उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा देत एक दावाच केला आहे.

जानकर म्हणाले, जो काही धनगर आणि ओबीसी समाज आमच्यामुळे भाजपसोबत होता, तो आता भाजपकडे पाठ फिरवताना दिसेल. भाजपने मला डावलल्याने राज्यातील लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल असा दावाही त्यांनी केला.

शरद पवार यांनी मला हेरले, विश्वास टाकला, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असे सांगताना लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...