Maharashtra Crime News: अमरावतीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका आश्रमात १७ वर्षीय मुलीवर मठात अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरवतीमधील हरिद्वापूर येथील महानुभाव आश्रमात १७ वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मठात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रिद्धपूर ही महानुभाव पंथीयाची काशी समजली जाते. यात मठात गेल्या अनेक महिन्यांपासून एका युवतीवर अत्याचार सुरु होता.
सुरेंद्र आणि बाळासाहेब या दोघांनी मावशीच्या साथीने तरुणीला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडत मुलगी ८ महिन्यांची गरोदर झाली. तिने या अत्याचाराची माहिती पीडित मावशीला दिली. मात्र, मावशीने पीडित तरुणीला गप्प राहण्यास सांगितले.