Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंह त्यांच्या नवजात मुलीसह घराकडे परतले आहेत. 8 सप्टेंबरला दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता, ज्यामुळे ती आणि रणवीर माता-पिता बनले आहेत.
रुग्णालयातून बाहेर पडताना दीपिका आणि रणवीर यांच्या गाड्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. दीपिकाची सासू-सासरे देखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते, पण त्यांच्या फोटोंमध्ये केवळ गाडीच दिसत आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते आणि सहा वर्षांच्या लग्नानंतर त्यांनी आपल्या छोट्या मुलीच्या आगमनाची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. गणेशोत्सवाच्या काळात या जोडप्याच्या आयुष्यात लक्ष्मीचे आगमन झाल्याचे पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.