spot_img
अहमदनगरसंजीव भोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश; 'या' कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर..

संजीव भोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश; ‘या’ कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. देसवडे तसेच संलग्न टेकडवाडी, काळेवाडी, जावळदरा येथील विकास कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संजीव भोर यांचे माध्यमातून देसवडे तसेच पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे.

देसवडे व अंतर्गत येणाऱ्या टेकडवाडी, काळेवाडी, जावळदरा येथील रस्त्यांचे व इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सूचनेवरून व ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने देसवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी 20 लक्ष रुपये, बोरमळा ते साकुर के.टी वेअर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 30 लक्ष रुपये, तसेच टेकडवाडी ते जावळदरा रस्त्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूरीची प्रशासकीय मान्यता निर्गमित झाली आहे.

मंजूर झालेल्या दोन्ही रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली होती, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीस येत होता. सदरचे दोन्ही रस्ते मंजूर झाल्याने देसवडे, पोखरी, वारणवाडी, परिसरातील नागरिकांना साकुर कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे देसवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत पूर्णतः मोडकळीस आलेली होती.

त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आलेली होती यासाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरच्या कामांना मंजुरी मिळाल्याने देसवडे सह संलग्न वाड्यांच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवक्ते संजीव भोर पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. देसवडे परिसर व पारनेर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी संजीव भोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...