spot_img
ब्रेकिंगभाजपाच्या उमेदवाराची पहिली यादी कधी होणार जाहीर?; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात महत्त्वपूर्ण...

भाजपाच्या उमेदवाराची पहिली यादी कधी होणार जाहीर?; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात महत्त्वपूर्ण संकेत

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री :-
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा जाहीर निर्णय अद्याप केला नाही. तथापि, भाजपची पहिली उमेदवार यादी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने १६० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी १५ दिवसांत भाजपच्या किमान ५० उमेदवारांना वैयक्तिक निरोप दिला जाऊ शकतो. ३ ऑक्टोबरनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होईल, असे संकेत अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यातून मिळाले आहेत. ८ सप्टेंबर रोजी रात्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नऊ प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.

बंडखोरीच्या संभावनांचा विचार करून, उमेदवारांना थेट निरोप देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे विद्यमान १०२ आमदार असल्यानामुळे अधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत ५० उमेदवारांची नावे असू शकतात. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे अमित शाहांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे इतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

MLA Sangram Jagtap: खुशखबर! नगरमध्ये २० इलेट्रिक बस धावणार; आमदार जगताप काय म्हणाले पहा…

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस...

Politics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! ‘यांनी’ दिला मोठा इशारा

Politics News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर मतदारसंघात (Parner-Nagar Matadarasaṅgha) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण...

Badlapur encounter case: बदलापूर एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; अक्षय शिंदेवर गंभीर गुन्हा दाखल

मुंबई | नगर सह्याद्री:- बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) पोलीस...

Ahmednagar Rain Update: परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले!

नगर, पारनेर, राहुरीत दमदार पाऊस | सरासरी १२९ मिलीमीटर पावसाची नोंद अहमदनगर | नगर सह्याद्री:- परतीच्या...