spot_img
अहमदनगरराष्ट्रवादीत वादाची ठिणगी! रुपाली पाटील संतापल्या; चाकणकरांना थेट विरोध; कारण काय? पहा..

राष्ट्रवादीत वादाची ठिणगी! रुपाली पाटील संतापल्या; चाकणकरांना थेट विरोध; कारण काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागण्याची शयता आहे. मात्र रुपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातून विरोध दर्शवला असून एकाच महिलेला किती पदे? असा सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत अजित पवार यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चाकणकरांच्या नावाला विरोध करणार..
दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी काय केलं काय बोलल्या याच्याशी मला घेणं नाही. त्यांचा माझा बांधाला बांधला नाही. आम्ही आमची मागणी अजित दादांजवळ मांडली आहे, पक्षात इतरही महिला आहेत. आम्ही आधीपासून पक्षात काम करत आहे. काम करणार्‍या महिलांना संधी मिळाली पाहिजे. किती वेळा अनेक पदे देणार? याचा विचार पक्षाने करावा. आम्हीही सामाजिक कार्य करतो. मग एकाच व्यक्तीला पदे देण्याचे कारण काय? मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव. निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार आहे. याबाबत मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे. आम्हाला त्या पटल्या तर मान्य करु, अन्यथा विरोध करु, असा थेट इशारा ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

अन्य महिलांना संधी द्यावी
एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार उपमुख्यमंत्री अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणार्‍या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी, ही विनंती असेल, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

एक व्यक्ती एक पद असावे : रुपाली ठोंबरे
राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत जे नावं चर्चेत आहेत, त्या बातम्या पेरण्यात आलेले आहेत. रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचे अध्यक्ष पद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी दोन पद आहे. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे, मी पण अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव. निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार आहे. याबाबत मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे, असेही त्या म्हणाल्यात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

बीड । नगर सहयाद्री:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन...

आमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी...

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...