spot_img
अहमदनगरभंडारदरा धरणाचे नाव बदलले! 'या' आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर

भंडारदरा धरणाचे नाव बदलले! ‘या’ आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
राज्यातील सर्वाधिक धरणं असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाणार्‍या भंडारदरा धरणाचे सरकारने नाव बदलले आहे. अकोले तालुम्यात असणारं हे फेमस ब्रिटिशकालीन धरण समजले जाणारे भंडारदरा धरणाचे आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आले आहे. याबाबत सरकारनं नुकताच अद्यादेश जारी केलाय.

महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणारे भंडारदरा धरण आणि तिथेच असणारा रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता धरणांचीही नावं बदलू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जलसंपदा विभागाच्या अख्त्यारितील अकोले तालुयातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात आले आहे.

कोण आहेत वीर राघोजी भांगरे?
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा धरणांसह क्रांतीकारकांचा तालुका समजला जातो. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अकोले तालुयातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी संघर्षमय लढा उभारला होता. यातच त्यांचे बलिदान दिले होते. त्यामुळे या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली होती. भंडारदरा गाव हे महादेव कोळी आदिवासी समाजबांधवाची अधिक संख्या असणारे गाव आहे. २०२१ पासून या नामकरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी भंडारदरा धरणावर आंदोलन उभारण्यात आले होते.

किती वेळा बदललेय भंडारदर्‍याचे नाव?
भंडारदरा धरण हे पर्यटनासाठी सध्या ओळखले जात असले तरी १९२६ साली ब्रिटिशांनी हे धरण बांधले होते. त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली विल्सन यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करून धरणाला विल्सन डॅम, असे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून ते आज पर्यंत शासन दरबारी भंडारदरा धरण हे विल्सन डॅम या नावाने संबोधले जाते. तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला त्याकाळचे ब्रिटिश इंजिनियर ऑर्थर हिल यांचे नाव देण्यात आले होते. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑर्थर लेक असेही संबोधण्यात येत होते. आता या धरणाचं नाव तिसर्‍यांदा बदललं आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी...

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...