spot_img
अहमदनगरशेतकर्‍यांना होणार फायदा! कांद्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

शेतकर्‍यांना होणार फायदा! कांद्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

spot_img

Onion Rate: सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या जवळ कांदा आहे, त्या शेतकर्‍यांना याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसरा बाजूला मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार आता ३५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणच्या दिलासा देण्यासाठी सरकारने कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव ६० रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकार आता या भागात ३५ रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, सरकार आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. हे दोन्ही सरकारी युनिट ३५ रुपये किलो दराने सर्वसामान्यांना कांदा उपलब्ध करून देणार आहेत.

नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची विक्री
नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सरकारच्या वतीने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतात. या संस्था मध्यवर्ती दुकाने, मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. गतवर्षी देशभरात कांद्याचे तसेच टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...