spot_img
अहमदनगरमेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेली सून परतलीच नाही? सासऱ्याची रानाकडे धाव..; घडलेली घटना...

मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेली सून परतलीच नाही? सासऱ्याची रानाकडे धाव..; घडलेली घटना ‘धक्कादायक’..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तीला वाचवण्यासाठी सासऱ्याने तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून व सासऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी: मुरलीधर मारुती नवले (७० वर्षे) व उज्वला आबा नवले (४० वर्ष) राहणार हिवरे कोरडा तालुका पारनेर असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहे. उज्वला नवले या आपल्या शेततळ्यातील पाणी मेंढ्यांना पाजण्यासाठी शेततळ्यावर पाणी काढताना त्यांचा पाय घसरून तळ्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सासर्‍यांनी तात्काळ धाव घेतली मात्र सासरे वयोवृद्ध असल्यामुळे प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरले या घटनेमध्ये सून व सासऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

यानंतर घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना कळविण्यात आली मुरलीधर नवले व उज्वला नवले यांचा ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोलीस नाईक सतीश बर्डे हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...