spot_img
मनोरंजनEntertainment News : तमन्ना भाटियाचे खुललं सौंदर्य; फोटोने वेधले साऱ्यांचे लक्ष

Entertainment News : तमन्ना भाटियाचे खुललं सौंदर्य; फोटोने वेधले साऱ्यांचे लक्ष

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम –
अभिनेत्री तमन्ना भाटियाने दक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मोठ्या पडद्यावर ती नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसते. अभिनयासोबतच ती अनेकदा तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. येत्या काही दिवसांवर आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवानिमित्त तमन्ना भाटियानं खास मनमोहित करणारे फोटोशुट केलं आहे.

अलीकडेच हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरून केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या फोटोंमध्ये तमन्नाने पेस्टल निळ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.

सोबत हेवी बॉर्डर असलेला गुलाबी दुपट्टा या लेहेंग्याच्या सौंदर्यात भर घालत आहे. राधाच्या लुकमध्ये तमन्ना सुंदर दिसत आहे. या लुकसह तिने राधाप्रमाणे कपाळावर लावलेला गंध विशेष लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये जंगलात एका झाडाखाली कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधाच्या रुपात तमन्ना दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोत श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तमन्नाच्या हातात मोरपंख दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने एकापेक्षा एक पोज देत सर्वांचे लक्ष वेधूंन घेतले आहे. दरम्यान, प्रसिद्ध डिझायनर तौरानीने जन्माष्टमीपूर्वी राधा-कृष्णाच्या कथेवर नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे. त्याच्यासाठी तमन्नाने हे फोटोशुट केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...