spot_img
अहमदनगरग्रामपंचायत करणार विमानतळावर कारवाई? मोठे कारण आले समोर….

ग्रामपंचायत करणार विमानतळावर कारवाई? मोठे कारण आले समोर….

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
ग्रामपंचायतचा कर थकवल्याने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतने ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली. वारंवार कराची मागणी करुनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम भरली नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२९ प्रमाणं शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्ती वारंट जारी करण्यात आले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ग्रामपंचायतचा ८ कोटी ३० लाख रुपयाचा कर थकीत आहे.

काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडे तब्बल साडेआठ कोटी रुपयांची कराची रक्कम थकीत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही ती रक्कम मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ अन्वये ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी दिली.
पत्रात म्हटले आहे की, करबाकी भरण्याबाबत सातत्याने पत्रे दिली आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये अंतिम पत्र दिले होते. २४ मार्च २०२४ रोजी हुकूम नोटीस, १२९ प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस अशा अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. तसेच ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव घेवूनही कर भरणा केलेला नाही. त्यामुळे आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२४ व कलम १२९ अन्वये मिळकतीप्रमाणे मागणी बिले, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत वॉरंट बजावले आहे.

या जागेचा भरला नाही कर
शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग, पेव्हर ब्लॅक एरिया, इंडियन आईल पंप, सबस्टेशन बिल्डिंग, पॉवर जेनरेटर बिल्डिंग, एटीसी टॉवर, रनवे, जीएसआर वॉटर टँक, वॉल कंपाउंड, पार्किंग रस्ता १ आणि २ अशा एकूण २३.५० एकर जागेची २०१८ पासून कर भरणा थकीत आहे.

दिली चार दिवसांची मुदत
शिर्डी विमानताळकडून ८ कोटी ३० लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर थकबाकी वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ अन्वये जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने सातत्याने शिर्डी विमानतळाकडे कराच्या रकमेची मागणी केली. येणार्‍या चार दिवसात कर नाही भरला तर विमानतळावरील सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती काकडी-मल्हारवाडी गावच्या सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...