spot_img
ब्रेकिंगMaharashtra Politics: विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा डाव; २८८ मतदारसंघात घेतला मोठा...

Maharashtra Politics: विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा डाव; २८८ मतदारसंघात घेतला मोठा निर्णय

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले डाव टाकायला सुरूवात केलीय. शरद पवार गटाने देखील २८८ मतदारसंघांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेसाठी शरद पवार गटाची रणनिती समोर आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट युवककडून २८८ निरीक्षकांची नियुक्ती केली गेली आहे.

कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडून राज्यातील २८८ मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील स्थानिक पातळीवर पक्षाचं काम करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्याची निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आलीय.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar group) वतीने मेहबूब शेख यांनी नियु्क्तीबाबत पत्र पार्टीतील पदाधिकाऱ्यांना पाठवलंय. या पत्रात म्हटलं गेलंय की, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षासाठी आजपर्यंत आपण दिलेलं योगदान लक्षात घेतलं जात आहे. त्यावरू विधानसभा जिल्हा पदावर निरीक्षक नियुक्ती करण्यात येत आहे.

२८८ मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नेमणूक
पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम प्रकारे कराल. तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी आपण योगदान द्याल, असा ठाम विश्वास पत्राद्वारे मेहबूब शेख यांनी व्यक्त केलाय. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पक्षाची ध्येय, धोरणे तसेच शरद पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. तसंच निवडीबद्दल त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. आजपासून उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर शरद पवार गटाने २८८ मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नेमणूक केलीय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...